परंपरा • श्रद्धा • भक्ती • शास्त्रोक्त विधी
पुण्यातील विश्वासार्ह जागरण गोंधळ सेवा
ll जय मल्हार ll
परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम. आपल्या घरात दिव्यत्व आणण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.
परंपरेचा वारसा भक्तीचा उत्सव
• आमच्या परंपरेत २० वर्षांपेक्षा अधिक अनुभव –
जागरण गोंधळ पार्टी पुणे ही महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह आणि अनुभवी गोंधळ पार्टी आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीने देवीचा गोंधळ, खंडोबाचे जागरण गोंधळ, देवी गोंधळ, नवसपूर्ती, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज, विवाह तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिभावाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडतो.
आमचे कलाकार पारंपरिक वाद्यांसह संबळ, तुणतुणे, टाळ यांचा वापर करून खंडोबा, तुळजाभवानी, रेणुका, यमाई अशा कुलदेवतांच्या स्तवनाचे कार्यक्रम शास्त्रीय पद्धतीने सादर करतात. अनुभवी गोंधळी कलाकारांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक कार्यक्रम श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा संगम साधत सादर करतो. ग्राहकांचे समाधान, वेळेचे पालन आणि दर्जेदार सेवा हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आमच्या सेवा उपलब्ध करून देत आहोत. आपल्या धार्मिक कार्यक्रमासाठी विश्वासार्ह आणि अनुभवी जागरण गोंधळ सेवेची आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
आमचे ध्येय आपल्या कुटुंबातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रम भक्तिमय, मंगलमय आणि संस्मरणीय व्हावा, हीच आमची मनापासून इच्छा आहे.
परंपरेचा सन्मान, भक्तीची सेवा, शास्त्रोक्त विधी
श्री खंडोबा जागरण
श्री खंडोबा देवांच्या कृपेचा आशीर्वाद मिळावा व कुलदैवताची भक्तिभावाने सेवा व्हावी यासाठी पारंपरिक पद्धतीने जागरण केले जाते. अनुभवी गोंधळींकडून विधीपूर्वक कार्यक्रम सादर केला जातो.
देवीचा गोंधळ
आई भवानी, तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी माता आदी देवींचा गोंधळ श्रद्धा आणि परंपरेनुसार सादर केला जातो. भक्तीमय वातावरणात धार्मिक विधी पूर्ण केले जातात.
नवसपूर्ती जागरण
हा नवसपूर्ती जागरण पूर्ण झालेल्या नवसाच्या पूर्ततेसाठी शास्त्रोक्त पद्धतीने जागरण आयोजित केले जाते. भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
मुंजीचा गोंधळ
मुंजी (उपनयन संस्कार) निमित्त कुलाचारानुसार गोंधळ घालून धार्मिक विधी पार पाडले जातात. हा कार्यक्रम कुटुंबाच्या आनंदात आणि मंगलमय वातावरणात भर घालतो.
गृहप्रवेश व वास्तुशांतीचा गोंधळ
नवीन घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी गृहप्रवेश व वास्तुशांतीनिमित्त गोंधळ आयोजित केला जातो. सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात.
धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम
विविध धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी पारंपरिक जागरण-गोंधळ सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक कार्यक्रम भक्तिभाव, शिस्त आणि संस्कृती जपत सादर केला जातो.
परंपरेचा सन्मान... भक्तीची सेवा...
अनुभवी व पारंपरिक गोंधळी
२० वर्षांहून अधिक काळाचा प्रत्यक्ष अनुभव व प्रशिक्षित कलाकार.
शास्त्रोक्त विधी
प्रत्येक विधी वेदशास्त्रांच्या नियमांनुसार पूर्ण जबाबदारीने.
मधुर व भक्तिमय सादरीकरण
मूळ मराठी शैलीतील शास्त्रोक्त गायन, वादन व सादरीकरण.
वेळेचे काटेकोर पालन
ठरलेल्या वेळेवर पोहोच, वेळेत सुरू व वेळेत समाप्ती पूर्ण जबाबदारीने.
संपूर्ण महाराष्ट्र सेवा
पुण्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर आदी शहरे.
नम्र, विश्वासार्ह आणि समाधानकारक
वादन व सादरीकरण, मंत्रघोष, संबळ, टाळ यांच्या ध्वनीत दिव्य अनुभूती.
प्रकाश आणि परंपरा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न?
देवघर, मूर्ती, हळद-कुंकू, फुले, नैवेद्य, आणि पारंपरिक साहित्य आवश्यक असते. आम्ही आगाऊ संपूर्ण यादी पुरवतो.
जागरण साधारण रात्रभर, तर गोंधळ ३ – ४ तासांचा असतो. कार्यक्रमानुसार वेळेचे नियोजन करता येते.
होय, पूर्ण साहित्य आपण पुरवू शकतो किंवा आपल्या यादीनुसार मार्गदर्शन करतो.
कार्यक्रमाचा प्रकार, कालावधी व स्थळ यानुसार दक्षिणा ठरते. कॉल केल्यावर आम्ही स्पष्ट सांगू.
★★★★★ 5.0
नमस्कार, आमच्या कडे जागरण गोंधळ झाला. खूप सुंदर केला आणि गायन सुंदर आहे तसेच वादनही अप्रतिम होते. मनापासून धन्यवाद.
Mahajan Lomate
★★★★★ 5.0
Nice experience for Munjoba Gondhal. The entire Jagaran Gondhal programme was professionally performed. Everything was well organized and devotional.
Vaibhav Kulkarni
★★★★★ 5.0
माझ्या मुलाच्या लग्नाच्या जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी सूरज शिंदे यांची जागरण गोंधळ पार्टी बोलावली होती. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि सुरळीत पार पडला. संपूर्ण आयोजन उत्कृष्ट होते. संगीत, पूजा आणि गोंधळाचा माहोल अत्यंत भक्तिमय होता. कलाकारांचे सादरीकरण अप्रतिम होते. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.
Vijaya Yadav
★★★★★ 5.0
आमच्याकडे कात्रजला जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम खरोखरच खूप सुंदर झाला आणि बघण्यासारखा होता. गायन, वादन आणि संपूर्ण सादरीकरण अप्रतिम होते. तुमचे मनापासून धन्यवाद.
Shahrukh Ansari
★★★★★ 5.0
The Gondhali team completed all the rituals in a proper and traditional manner with great devotion and discipline. Every custom was followed respectfully. We truly appreciate their dedication, sincerity and excellent service.
Jyoti Gaikwad
★★★★★ 5.0
सुंदर असा कार्यक्रम केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुढील वेळी संधी मिळाली तर तुम्हालाच कार्यक्रम देणार. इतरांनाही तुमच्या जागरण गोंधळ पार्टीची शिफारस करेन. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
Suraj Jadhav
★★★★★ 5.0
जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर, भक्तिमय आणि मनमोहक झाला. गोंधळी मंडळींचे सुमधुर गायन, पारंपरिक वादन आणि देवी-देवतांच्या महिम्याचे केलेले वर्णन मनाला स्पर्शन गेले. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते. अशी आपली महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा जपणाऱ्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. आई जगदंबा, खंडेराया आणि सर्व देवतांचा आशीर्वाद आपण सर्वांवर सदैव राहो. पुन्हा एकदा असा दिव्य सोहळा अनुभवायला मिळो हीच प्रार्थना. जय मल्हार ! येळकोट येळकोट जय मल्हार !
Aman Daddy
★★★★★ 5.0
20 june roji majhya donhi mulanchya munji nantar tulja bhavani matecha gondhal thevala hota. Jagran gondhal team ne atishay sunder ani thasthasit gondhal program paar padla. Sarva pahune mandali khush jhali. Sagla program velet suru karun time madhe sampavla. Thank you so much team amhala khup khup awadla gondhal program. Highly highly recommended!
Sheetal Chitnis